जायकवाडीच्या जलपूजनानिमित्त शिवसेना-भाजपामध्ये चढाओढ

भाजपा आणि शिवसेना राज्यात सत्तेत एकत्र असले तरी त्यांच्यामध्ये सुरू असलेला उंदरा-मांजराचा खेळ पदोपदी पहायला मिळतोय. 

Updated: Sep 28, 2017, 05:28 PM IST
जायकवाडीच्या जलपूजनानिमित्त शिवसेना-भाजपामध्ये चढाओढ title=

औरंगाबाद : भाजपा आणि शिवसेना राज्यात सत्तेत एकत्र असले तरी त्यांच्यामध्ये सुरू असलेला उंदरा-मांजराचा खेळ पदोपदी पहायला मिळतोय. 

पैठणच्या जायकवाडी धरणाच्या जलपूजनावरून शिवसेना आणि भाजपामधला तणाव पुन्हा दिसून आला. सकाळी 10च्या सुमारास शिवसेना नेते जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी धरणाची पाहणी केली आणि जलपूजनही केलं... 
त्यानंतर याच खात्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी 2 वाजता पुन्हा धरणाची पाहणी आणि जलपूजन केलं.

मात्र याबाबत विचारलं असता शिवतारे यांनी आपला दौरा पूर्वनियोजित असल्याचं आणि याची कल्पना महाजनांना दिल्याचं सांगितलं असलं तरी यामुळे शिवसेना-भाजपामधला कलगीतुरा पुन्हा एकदा समोर आलाय.