एकतर्फी प्रेमातून मुलीचं घर जाळण्याचा प्रयत्न

ठाण्यातील खारटन रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून एका २५ वर्षीय मुलाने मुलीचं घर जाळण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री उशिरा हा प्रकार घडला. पोलिसांनी घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला ताब्यात घेतलं आहे. एकतर्फी प्रेमातून मुलींवर हल्ले होण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे.

Updated: Oct 2, 2018, 02:01 PM IST
एकतर्फी प्रेमातून मुलीचं घर जाळण्याचा प्रयत्न  title=

ठाणे : ठाण्यातील खारटन रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून एका २५ वर्षीय मुलाने मुलीचं घर जाळण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री उशिरा हा प्रकार घडला. पोलिसांनी घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला ताब्यात घेतलं आहे. एकतर्फी प्रेमातून मुलींवर हल्ले होण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे.

व्हॉट्सअॅपवर या मुलाने त्या मुलीसोबतचा एक फोटो ठेवला होता. मुलीचं यावरुन त्या मुलासोबत वाद झाला. मुलीने तिचं लग्न ठरलं असून असं न करण्यासाठी मुलाला सांगितलं होतं. या वादानंतर मुलाने रात्री घरात आगीचा एक गोळा टाकला. ज्यामध्ये काही कपडे जळाले. पण सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. पोलिसांनी या मुलाला अटक केली आहे.