पुण्यात वाटले सोन्याचे पेढे, कारणंही आहे तेवढंच 'सोनेरी'

सोन्याच्या बाबतीत पुणेकरांचा कुणी नाद न केलेलाच बरा. पुण्यात आतापर्यंत तसे दोन गोल्डमॅन प्रसिद्धीस आलेत.

Updated: Sep 6, 2018, 06:08 PM IST
पुण्यात वाटले सोन्याचे पेढे, कारणंही आहे तेवढंच 'सोनेरी'  title=

पुणे : सोन्याच्या बाबतीत पुणेकरांचा कुणी नाद न केलेलाच बरा. पुण्यात आतापर्यंत तसे दोन गोल्डमॅन प्रसिद्धीस आलेत. पहिले दिवंगत आमदार रमेश वांजळे आणि दुसरे दत्तात्र फुगे. त्यात सोन्याचा शर्ट, हे त्यातलं एक आश्चर्यचं होतं. पण सोन्याविषयीच्या आश्चर्याला आता सीमा नाहीय, हे निश्चित.

कारण, आता पुणे जिल्ह्यात आनंद साजरा करण्यासाठी खायला सोन्याचे पेढे वाटले गेले आहेत. खाण्याचं कॉम्बिनेशन देखील सोन्याशी जोडलं गेलं आहे. जॅग्वार एक्स एफ कार घेतल्यानंतर, या माणसाने चक्क सोन्याचे पेढे वाटले. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. (व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

काका हलवाई यांनी बनवले सोन्याचे पेढे

सुरेश पोकळे यांना सोन्याचे पेढे वाटायचे होते, त्यांनी ही कल्पना काकाहलवाई यांच्याकडे मांडली. अखेर त्यांनी सोनेरीवर्ख लावून बनवलेले पेढे बनवून दिले. काका हलवाई यांनी ७ हजार रूपये किलोने हे पेढे सुरेश पोकळे यांना बनवून दिले. एका किलोत ३० पेढे देण्यात आले आहेत. तेव्हा १ पेढा २३३ रूपयांचा आहे.

१ कोटी १४ लाखाची गाडी

पुणे जिल्ह्यातील घायरी गावचे सुरेश रामनाथ पोकळे यांनी जग्वार एक्स एफ ही गाडी घेतली. आता हा त्यांच्यासाठी निश्चितच सोनेरी क्षण होता. कारण पिढ्यांपिढ्या शेती करूनही, त्यांनी कधी एवढ्या महागड्या ब्रॅण्डची गाडी घेतली नाही. पण इतर व्यवसायाच्या मदतीने अनेक वर्षापासून त्यांनी हालाखीतून वर येत, आज कुटूंबाची स्थिती जग्वार गाडी वापरण्यापर्यंत आणून ठेवली. या गाडीची किंमत १ कोटी १४ लाख असल्याचं सांगण्यात येत आहे.