लातूरच्या आयडिअल शिकवणीबाहेर सीसीटीव्ही

आयडियल इन्स्टिटयूट ऑफ बायोलॉजीने आपल्या शिकवणी परिसराच्या चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 9, 2017, 10:34 AM IST
लातूरच्या आयडिअल शिकवणीबाहेर सीसीटीव्ही  title=

लातूर : आयडियल इन्स्टिटयूट ऑफ बायोलॉजीने आपल्या शिकवणी परिसराच्या चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.

तसेच त्या सीसीटीव्हीचे थेट कनेक्शन पोलीस नियंत्रण कक्षात दिले आहे. जेणेकरून एखादी छेडछाडीची किंवा गुन्हेगारीची घटना घडलीच तर पोलीस त्या सीसीटीव्हीच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावू शकतील. क्लासेसला येणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे, शिकवणी परिसरात घडणा-या वाढत्या गुन्हयांवर आणि गुन्हेगारांवर थेट नजर ठेवता येणार आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सर्वच खाजगी शिकवणी चालक आणि महाविद्यालयांनीही पुढे येण्याचे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक चिरंजीवी प्रसाद यांनी केलंय.