हैदोस घालणारा बिबट्या जेरबंद, नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही इथे वनविभागानं एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे.

Updated: Dec 27, 2017, 04:01 PM IST
हैदोस घालणारा बिबट्या जेरबंद, नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास title=

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही इथे वनविभागानं एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे. सिंदेवाही तालुका स्थानापासून लगत असलेल्या लोनवाही इथे या बिबट्यानं चांगलाच धुमाकूळ घातला होता.

अनेक कुत्री ठार

गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याने परीसरात हैदोस घातला होता. या बिबट्याने परिसरातली अनेक कुत्री ठार मारली होती. तालुकास्थानी असलेल्या विश्रामगृहाच्या शेजारी वनविभागानं या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. 

पकडण्यासाठी कुत्र्याचा वापर

सकाळी या पिंज-यात बिबट्या अडकल्यानं, अखेर सिंदेवाही-लोनवाही भागातल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंज-याच्या दुस-या भागात चक्क कुत्रा ठेवला गेल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.