चंद्रपुरातील मारोडा वनक्षेत्रात आढळलं बिबट्याचं अशक्त पिल्लू

Updated: May 27, 2018, 08:53 PM IST

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मुलूल बफर क्षेत्रातल्या मारोडा राऊंडमधील उश्राळा या गावातील नदीजवळ नर जातीच्या बिबट्याचा बछडा मरणासन्न अवस्थेत सापडलाय. मारोडा वनक्षेत्राचे वनरक्षक पाडदे यांनी बछड्याला मुल येथील रुग्णालयात नेलं असून उपचारासाठी चंद्रपूरच्या  ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे दाखल करण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते तापमान आणि घटते जलसाठे या पार्श्वभूमीवर आपल्या आईसह पाण्यासाठी भटकंती करणारे हे पिलू आईपासून वेगळे झाले असल्याची शंका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.