छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम पाठ्यपुस्तकात येणार

शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातून आता छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास वाचता येणार आहे. यासंदर्भातील घोषणा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच केली आहे. 

Updated: Mar 18, 2018, 01:49 PM IST
छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम पाठ्यपुस्तकात येणार  title=

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातून आता छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास वाचता येणार आहे. यासंदर्भातील घोषणा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच केली आहे. 

शालेय अभ्यासक्रमात 

 संभाजी राजांच्या कर्तृत्वाचा इतिहास पाठ्यपुस्तकात येण्याची मागणी वारंवार केली जात होती. शालेय अभ्यासक्रम मंडळाला यासंदर्भातील सूचना देण्यात आल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. 

भव्य संग्रहालय उभारणार 

 छत्रपती संभाजी राजांच्या कर्तृत्वाची ओळख पुढच्या पिढीपर्यंत व्हावी या हेतूने भव्य संग्रहालय उभारण्यात येणार आहे. 

श्री क्षेत्र वढू-तुळापूर येथे हे संग्रहालय उभारण्याची संकल्पना शासनाने आखली आहे. तसेच या ठिकाणाला शासकीय मानवंदना तीर्थक्षेत्र बनविण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु असे तावडेंनी यावेळी सांगितले.