मिनी थिएटरसाठी बालकलाकाराचा लढा

अवघ्या आठ वर्षांच्या अथर्व वगळ या बालकलाकाराने लढा सुरु केला आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 12, 2018, 11:57 AM IST
मिनी थिएटरसाठी बालकलाकाराचा लढा title=

ठाणे : ठाणे महापालिकेच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर सुरु व्हावं, यासाठी अवघ्या आठ वर्षांच्या अथर्व वगळ या बालकलाकाराने लढा सुरु केला आहे. 

सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना निवेदन

क्राईम पेट्रोल, आहट, सावधान इंडिया अशा नावाजलेल्या मालिकांमध्ये काम करत असलेल्या अथर्वने ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, तसंच राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना याबाबतचं निवेदन दिलं आहे. 

पाच महिन्यांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद

ठाणे महापालिकेचच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातलं मिनी थिएटर गेल्या पाच महिन्यांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. त्यामुळे कलाकारांनी सराव करायचा कसा हा प्रश्न या चिमुकल्या कलाकाराने सरकारी यंत्रणांना विचारला आहे. यावर तावडे आणि महापौरांनी हे थिएटर लवकर सुरु करण्यात येईल असे आश्वासन दिले.