डेबिट-क्रेडीट कार्डाचे क्लोनिंग, पुणे पोलिसांनी एकाला केली अटक

डेबिट आणि क्रेडीट कार्डाचं क्लोनिंग करून पैसे चोरणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केलीय. हा आरोपी नायजेरियन आहे. 

Updated: Aug 17, 2017, 06:54 PM IST
डेबिट-क्रेडीट कार्डाचे क्लोनिंग, पुणे पोलिसांनी एकाला केली अटक  title=

पुणे : डेबिट आणि क्रेडीट कार्डाचं क्लोनिंग करून पैसे चोरणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केलीय. हा आरोपी नायजेरियन आहे. 
या नायजेरियन आरोपीला पुणे पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरुमधून अटक केली. त्याच्या एका साथीदारालाही अटक करण्यात आलीय. त्याचे इतरही नायजेरियन साथीदार असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.

पुण्यात काही हॉटेल, मॉल, पेट्रोल पंप आणि एटीएम मशीनमध्ये स्कीमर बसवले जायचे. त्यातून ही टोळी डेबिट आणि क्रेडीट कार्डाचे क्लोनिंग करायची. त्यानंतर बनावट कार्डच्या सहाय्याने एटीएममधून मशीनमधून पैसे काढले जायचे. 

पोलीस ठाण्यात एटीएममधून पैसे चोरीला गेल्याचा गुन्हा देखील झाला होता. त्याआधारे ही कारवाई करण्यात आली आहे.