राणे यांच्या समर्थनार्थ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

 नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी आपल्या पदांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. 

Updated: Sep 23, 2017, 08:46 PM IST
राणे यांच्या समर्थनार्थ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे  title=

रत्नागिरी :  नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी आपल्या पदांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. 

काल चिपळूण, राजापूर आणि लांजामधील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी राणेंच्या समर्थनार्थ आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. त्यानंतर आज रत्नागिरी तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. 

जिल्ह्यातही काँग्रेसच्या अनेक पदाधिकार्यानी गेल्या दोन दिवसांत राजीनामे दिले आहेत. त्यामध्ये चिपळूण, राजापूर, आणि लांजा या तालुक्यातील पदाधिकारयांचा समावेश होता. त्यानंतर आज रत्नागिरी तालुक्यातील राणे समर्थकांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले. 

पत्रकार परिषद घेऊन या पदाधिकार्यानी तशी घोषणा केली. आता आमचा पक्ष हा राणे साहेबच असून ते जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही राहू, असे या कार्यकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.