काँग्रेसकडून नागपुरात राज्य पुस्तक महामंडळाविरोधात आंदोलन

यावेळी आंदोलनकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या पोस्टरला काळं फासत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

Updated: Jul 28, 2017, 11:53 PM IST
काँग्रेसकडून नागपुरात  राज्य पुस्तक महामंडळाविरोधात आंदोलन title=

नागपूर : राज्य पुस्तक महामंडळाच्या नववीच्या पुस्तकात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापल्याच्या विरोधात युवक काँग्रेसच्यावतीनं नागपुरात निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या पोस्टरला काळं फासत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

राज्य पुस्तक महामंडळाच्या नववीच्या इतिहास आणि नागरिक शास्त्राच्या पुस्तकात 1980 च्या दशकात झालेल्या बोफोर्स तोफ प्रकरणात राजीव गांधींवर आरोप झाले होते. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याचा दावा करण्यात आलाय. आता हा वादग्रस्त मजकूर हटवण्याची मागणी करण्यात आलीय.  राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाच्या संचालकांनी माफी मागावी अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलीय.