दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी

केंद्रीय कॅबिनेटने दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे. तब्बल २ हजार ३३ कोटींच्या या प्रकल्पाला वार्षिक पाच टक्के वाढीव खर्चासह मंजुरी देण्यात आली आहे. 

Updated: Sep 14, 2017, 09:42 PM IST
दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी  title=

नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेटने दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे. तब्बल २ हजार ३३ कोटींच्या या प्रकल्पाला वार्षिक पाच टक्के वाढीव खर्चासह मंजुरी देण्यात आली आहे. 

२४७ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग असून याचे दुहेरीकरण पुढील पाच वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. या दुहेरीकरणामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या नागरिकांना मोठा फायदा होणार असून त्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. 

या दुहेरीकरणामुळे रेल्वे पर्यटन विकासाला चालना मिळणार असून शिर्डी आणि शनिशिंगणापूरच्या यात्रेकरुंचा प्रवासही सुलभ होणार आहे.