भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, चंद्रकांत पाटील यांनी अशी वेळ मारुन नेली!

प्रभारी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असलेल्या चंद्रकांत पाटील यांना धुळ्यात भाजपमधील अंतर्गत कलहाचा सामना करावा लागला. 

Updated: Jun 17, 2018, 05:47 PM IST
भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, चंद्रकांत पाटील यांनी अशी वेळ मारुन नेली! title=

धुळे : प्रभारी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असलेल्या चंद्रकांत पाटील यांना धुळ्यात भाजपमधील अंतर्गत कलहाचा सामना करावा लागला. शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक प्रचारासाठी आलेल्या पाटील यांना माजी मंत्री एकनाथ खडसे आणि आमदार अनिल गोटे यांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीचा कार्यकर्त्यांना जाब विचारला. निवडणूक पत्रकात खडसेंचा फोटो नाही, तसेच आमदार गोटेंना डावललं जात असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. मात्र चाणाक्ष पाटील यांनी आता हा विषय नको असं सांगत वेळ मारून नेली.

महाजन आणि खडसे वाद 

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या भोसरी जमीन प्रकरणाची चौकशीसाठी झोटींग समिती नेमली. या समितीचा अहवाल आला. खडसे यांना मुख्यमंत्र्यांनी क्लिन चिट दिलाय. असे असताना त्यांना का डावलण्यात येत आहे, असा सवाल काही कार्य़कर्त्यांनी उपस्थित केल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रश्नांच सरबत्ती झाल्याने चंद्रकांत पाटील एकदम सर्तक झालेत. त्यांनी ही वेळ नाही, असे सांगूत आपली वेळ मारुन नेली. दरम्यान, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. भाजप विस्ताराचे श्रेय देताना खडसे यांनी महाजन यांना नाव न घेता टोला लगावला होता.  भाजपच्या विस्ताराचं श्रेय संघ परिवाराला जळगाव जिल्ह्यात भाजपच्या विस्ताराचं श्रेय संघ परिवाराला जात असल्याचं सांगत त्यात आपल्यासह डॉ. अविनाश आचार्य, बापूराव मांडे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे यांचा सहभाग असल्याचं माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी नमूद केलं. मात्र यावेळी त्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचं नाव घेणं टाळलं. तसंच राजकारणात पाय खेचणाऱ्यांची कमी नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. त्यामुळे गिरीश महाजन आणि खडसे वाद आधी उफाळला होता.

'मरणापेक्षा वाईट मरण अनुभवलंय'

दरम्यान, पुणे येथे आपण वाईट अनुभव घेत असल्याचे खडसे यांनी सांगत भाजपला कोंडीत पकडले होते. मरणापेक्षा वाईट मरण गेल्या दोन महिन्यांत अनुभवलंय अशा शब्दांत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा जाहीर खदखद पुणे येथे व्यक्त केली होती. अशा मंत्रिपदावर लाथ मारतो असं खडसे यांनी म्हटलंय. पुण्याच्या जागर ग्रुपने एका समारंभात खडसे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी खडसेंनी आपल्या मनातली खंत पुन्हा एकदा जाहीरपणे व्यक्त केली होती. राज्यातील जनतेच्या ताकदीवर आपण तरलो तसंच मुंडे असते तर राज्याचे राजकारण वेगळं असते असंही खडसेंनी म्हटलंय. गेल्या ४० वर्षांत ८ मुख्यमंत्र्यांवर कडक प्रहार केले. मात्र यावेळेचा अनुभव याआधी कधीच आला नव्हता अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केलीय.