पत्नीच्या जाचाला कंटाळून पुण्याच्या डॉक्टरची आत्महत्या

चित्रपट निर्माता अतुल तापकीर यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच पुण्यातील एका डॉक्टरनं पत्नीच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवल्याची घडली आहे.

Updated: Jun 19, 2017, 10:14 PM IST
पत्नीच्या जाचाला कंटाळून पुण्याच्या डॉक्टरची आत्महत्या

पुणे : चित्रपट निर्माता अतुल तापकीर यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच पुण्यातील एका डॉक्टरनं पत्नीच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवल्याची घडली आहे. ५ जून रोजीची ही घटना आहे. अभयसिंह मचे असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव आहे. ते वाघोली परिसरात राहत होते.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी आत्महत्यासाठी पत्नी जाबाबदार असल्याचे म्हंटलय. याप्रकरणी अभयसिंह यांचे वडील मारुती मचे यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

पत्नी अभयसिंह यांच्याकडे मौजमजा तसेच चैनीच्या वस्तुंसाठी सारखी तगादा लावायची. हा मानसिक त्रास सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचं तक्रारीत म्हटलय. त्यानुसार याप्रकरणी आरोपी पत्नीच्या विरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.