पत्नीचा छळ करणाऱ्या सैन्य अधिकाऱ्याला बेड्या

अश्लील फोटो काढून ते सोशल साईट्सवर टाकण्याची धमकी 

Updated: Nov 8, 2018, 04:07 PM IST
पत्नीचा छळ करणाऱ्या सैन्य अधिकाऱ्याला बेड्या

आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : पत्नीचा छळ करणाऱ्या सैन्यदलाच्या अधिकाऱ्याला डोंबिवली पोलिसांनी अटक केलीय. प्रशांत मोरे असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते भारतीय सैन्यात कॅप्टन पदावर कार्यरत आहेत. प्रशांत मोरे याचं २०१५ साली डोंबिवलीच्या स्नेहा मोरे यांच्याशी लग्न झालं होतं. मात्र, त्यानंतर सतत काही ना काही कारणावरून तो आपल्या पत्नीचा छळ करत होता. इतकंच नाही तर आपले अश्लील फोटो काढून ते सोशल साईट्सवर टाकण्याची धमकी देत होता, असा आरोप त्यांच्या पत्नीचा आरोप आहे. 

याबाबत पत्नीच्या तक्रारीनुसार डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी याबाबतचा गुन्हा दाखल केला. यानंतर प्रशांत मोरे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानं अखेर पोलिसांनी त्यांना पुण्याच्या सैन्यतळावरून अटक केली. त्यांना आज कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. 

दरम्यान, मोरे यांची आजवर जिथे जिथे पोस्टिंग झाली, तिथे तिथे त्यांनी अनेक महिलांना नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आलाय. याबाबत रामनगर पोलीस सध्या कसून तपास करत आहेत.

या सगळ्याबाबत स्नेहा मोरे यांना विचारलं असता, आपल्याला आपल्या पतीची दुष्कृत्य समोर आणायची असल्यानं हे पाऊल उचलल्याचं त्यांनी म्हटलंय. सोबतच सैन्याचं नाव आपल्याला खराब करायचं नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. कॅमेऱ्यासमोर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close