डीएसके यांना पुणे कोर्टात हजर करणार

डीएसके यांना ५ वाजता केले जाणार पुणे कोर्टात हजर केले जाणार आहे. पुणे न्यायालयातील न्यायाधीश उत्पात यांच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दिल्ली येथून पहाटे ३ वाजता डिएसके यांना अटक करण्यात आली आहे.

Updated: Feb 17, 2018, 01:19 PM IST
डीएसके यांना पुणे कोर्टात हजर करणार title=

पुणे : डीएसके यांना ५ वाजता केले जाणार पुणे कोर्टात हजर केले जाणार आहे. पुणे न्यायालयातील न्यायाधीश उत्पात यांच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दिल्ली येथून पहाटे ३ वाजता डिएसके यांना अटक करण्यात आली आहे.

डीएस कुलकर्णी दिल्लीतून अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.  पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. दरम्यान, डीएसकेंसोबत पत्नी हेमंतीही हिला ताब्यात घेण्यात आले.

ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पैसे परत करण्याच्या नावाखाली दिलेली वेळ न पाळणा-या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना दिल्ली इथून ताब्यात घेण्यात आलंय. डीएसकेंना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखा पुणे पोलीस सुत्रांनी दिलीये.

डीएकेंसह त्यांच्या पत्नी हेमंती यांनाही ताब्यात घेण्यात आलंय. संध्याकाळपर्यंत दोघांनाही पुण्यात आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाने यांनी दिलीय.

शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखा पुणे यांची चार पथकं डीएसकेंना अटक कऱण्यासाठी रवाना झाली होती. डीएसकेंविरोधात आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे 4 हजार तक्रारी अर्ज आले आहेत. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 284 कोटी 20 लाख 16 हजार 580 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आलंय. तर पुणे पोलिसांकडे डीएसके यांनी कर्ज म्हणून वैयक्तिक घेतलेल्या रकमांसदर्भातही तक्रारी आल्या आहेत.