एक था टायगर... डबा पळवून नेणारा!

 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ म्हणजे अवघ्या वन्यजीवप्रेमींचा जिव्हाळ्याचा विषय...

Updated: Dec 7, 2017, 10:04 PM IST
एक था टायगर... डबा पळवून नेणारा!

ताडोबा : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ म्हणजे अवघ्या वन्यजीवप्रेमींचा जिव्हाळ्याचा विषय...

वाघ तसा मांसाहारी प्राणी... मात्र तो माणसाचा डबा घेऊन जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामुळे वाघही शाकाहारी झाला की काय? अशी चर्चा रंगलीय. 

ताडोबात सध्या हंगामी वनमजूर वेगवेगळ्या ठिकाणी गवत कापण्याच्या कामात व्यस्त आहेत. हे मजूर एका ठिकाणी साऱ्यांचे डबे ठेऊन गवत कापण्यासाठी गेले असता... डबे ठेवलेल्या ठिकाणी वाघ पोहचला.

तिथं ठेवलेल्या डब्यांपैंकी एक डबा त्यानं तोंडात उचलला... यामुळे वाघाला शिकारीचा कंटाळा आला असून आता तो माणसांच्या डब्यांवर ताव मारु लागलाय, अशी चर्चाही रंगलीय.

दरम्यान, ज्यांच्या डबा उचलला त्या ताराबाई या वाघिणीवर फारच खूश आहेत. वाघामुळे त्यांचीही सोशल मीडियावर चर्चा होतेय, हेही नसे थोडके...