खडसेंनी दिला सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे सध्या सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. पक्ष सोडण्याचा इशारा दिल्यानंतर खडसेंनी आता त्यांच्या सरकारच्या विरोधातच उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 9, 2018, 07:41 PM IST
खडसेंनी दिला सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा

जळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे सध्या सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. पक्ष सोडण्याचा इशारा दिल्यानंतर खडसेंनी आता त्यांच्या सरकारच्या विरोधातच उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. 

आरोग्यमंत्रीपद सेनेकडे असून या निमित्तानं खडसेंनी आता सेनेला टार्गेट केलंय. खडसेंच्या बोदवड तसंच मुक्ताईनगर मतदारसंघातील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध राहत नाहीत याबाबत आपण सहा महिन्यांपासून आरोग्यमंत्र्यांना पत्र दिली, स्मरण पत्रे दिली तरी कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही. 

त्यामुळे आरोग्याच्या प्रश्नावर आपण उपोषण करणार असल्याचं खडसे यांनी जळगावात सांगितलं.