शेतकऱ्याला पोलीस ठाण्यात ह्रदयविकाराचा झटका

चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलेल्या शेतकऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात घडली.

Updated: Jun 17, 2017, 01:42 PM IST
शेतकऱ्याला पोलीस ठाण्यात ह्रदयविकाराचा झटका title=

सांगली : चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलेल्या शेतकऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात घडली.

 बेगडमध्ये एका शेतकऱ्याची तूर आणि हरभऱ्याच्या पोत्यांची चोरी झाली होती. त्या शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर श्रीरंग तथा श्रीहरी पाटील यांच्यासह सहा जणांना मिरज पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी पाटील यांना ह्रद्यविकाराचा झटका आला. 

पाटील यांना तातडीने शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान  त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, चौकशीवेळी पाटील यांना मारहाण झाली होती का, याची चौकशी सीआयडीमार्फत करण्याची मागणी पाटील यांच्या नातेवाईकांनी केली आहे.