लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार?

 लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार? असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Updated: Sep 14, 2017, 05:11 PM IST
लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार?

यवतमाळ : लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार? असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे.
उद्या ऑनलाईन अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे.

तांत्रिक अडचणी, लोडशेडिंग अशा अनंत अडचणींमुळे शेतकऱ्यांना अर्ज भरणे शक्य होत नसल्याने, अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ४८ लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत, मात्र अजूनही ४० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे अर्ज बाकी आहेत.