औरंगाबादमध्ये बोंडआळीचा पहिला बळी, शेतक-याची आत्महत्या

मराठवाड्यात कापूस उत्पादक शेतक-यांचे बोंडअळीनं पिक उद्धवस्त केलं आहे. अनेकांची स्वप्न या बोंडअळीनं उद्धस्त केली आहेत. त्यात आता बोंडअळीच्या या नुकसानीमुळं शेतक-यांच्या आत्महत्या सुरु झाल्या आहेत.

Updated: Dec 8, 2017, 06:17 PM IST
औरंगाबादमध्ये बोंडआळीचा पहिला बळी, शेतक-याची आत्महत्या title=

औरंगाबाद : मराठवाड्यात कापूस उत्पादक शेतक-यांचे बोंडअळीनं पिक उद्धवस्त केलं आहे. अनेकांची स्वप्न या बोंडअळीनं उद्धस्त केली आहेत. त्यात आता बोंडअळीच्या या नुकसानीमुळं शेतक-यांच्या आत्महत्या सुरु झाल्या आहेत.

पंढरीनाथ भवरेची आत्महत्या

औरंगाबादच्या ३० वर्षीय शेतकरी पंढरीनाथ भवरे यानं आत्महत्या केली आहे. शेतात विषारी औषध प्राशन करून त्यानं आत्महत्या केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो बंडअळीमुळ झालेल्या नुकसानीनं चिंतेत असल्याचं त्याच्या भावानं सांगितल त्यामुळं रात्रीतून त्यानं आपली जिवन यात्रा संपवली.

सरकारचं दुर्लक्ष

बोंडआळीमुळे राज्यभरातील शेतकरी हैराण झाला असताना सरकार मात्र केवळ आश्वासनांची बरसात करत आहे. अजूनही अनेक ठिकाणी पंचनामे सुरू करण्यात आलेले नाहीयेत. त्यामुळे शेतक-याने आता नुकसान झाल्याने आत्महत्येचा मार्ग स्विकारला आहे. त्यामुळे आता तरी सरकार याकडे लक्ष देणार का? हे बघणे महत्वाचं ठरणार आहे.