कापसाचे भाव घसरल्याने यवतमाळ कृषी बाजार समितीत शेतकऱ्यांचे आंदोलन

घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आज शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. कापसाचे भाव अचानक ५०० रुपयांनी गडगडल्याने शेतकरी संतप्त झाले होते. 

Updated: Jan 3, 2018, 11:06 PM IST
कापसाचे भाव घसरल्याने यवतमाळ कृषी बाजार समितीत शेतकऱ्यांचे आंदोलन

यवतमाळ : घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आज शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. कापसाचे भाव अचानक ५०० रुपयांनी गडगडल्याने शेतकरी संतप्त झाले होते. 

शेतकऱ्यांनी रस्ता रोखला

शेतकऱ्यांनी यार्डाबाहेर पडून रस्ता रोखून धरत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. गेल्या काही दिवसांपासून कापसाला बावनशे रुपयांवर क्विंटलप्रमाणे भाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात कापसाची आवक घाटंजीतील स्वर्गीय सुरेशबाबू लोणकर कापूस मार्केट यार्डमध्ये झाली. 

कापूस भावात अचानक घसरण

मात्र आज अचानक या भावात ५०० रुपयांची घसरण होऊन ३७०० रुपये भाव व्यापाऱ्यांनी केला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांवर अन्याय का, शेतकऱ्यांची लूट थांबवा, अशा घोषणा देत सामूहिकरीत्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले.

 त्यानंतर घाटंजीतील कापूस खरेदी बंद करण्यात आली. व्यापाऱ्यांनी संघटीतपणे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी भाव पाडले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close