बारामतीत काय हे, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

बारामतीत 22 मे पासून शासनाने पुन्हा तूर खरेदी केंद्र सुरू केलं. मात्र गेल्या दोन दिवसांत तूर घेण्याऐवजी तूर नाकारण्याचं प्रमाण अधिक आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 27, 2017, 07:21 PM IST
बारामतीत काय हे, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा title=

पुणे : बारामतीत 22 मे पासून शासनाने पुन्हा तूर खरेदी केंद्र सुरू केलं. मात्र गेल्या दोन दिवसांत तूर घेण्याऐवजी तूर नाकारण्याचं प्रमाण अधिक आहे. 

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाफेडच्या वतीनं तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं असून शेतक-यांनी एकच गर्दी केलीय. 

मात्र चांगल्या प्रतीची तूरही नाकारण्यात येतंय. त्यामुळे शेतक-यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे या तुरीचं करायचं काय असा प्रश्न शेतक-यांसमोर पडलाय.