वादातून मुलाचा लोखंडी रॉडने जोरदार प्रहार, वडिलांचा जागीच मृत्यू

रागाच्या भरात मुलाने दारुड्या वडिलांचा खून केल्याची घटना. 

Updated: Dec 8, 2018, 06:40 PM IST
वादातून मुलाचा लोखंडी रॉडने जोरदार प्रहार, वडिलांचा जागीच मृत्यू title=

नागपूर : रागाच्या भरात मुलाने दारुड्या वडिलांचा खून केल्याची घटना येथे घडली. संतोष बेनीबागडे हे दारु पिऊन घरी आलेत. त्यावेळी मुलामध्ये वाद झाला. या वादात रागाच्या भरात सचिनने वडिलांवर लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नंदनवन पोलिसांनी आरोपी सचिनविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय.

संतोष बेनीबागडे यांचा २१ वर्षांचा मुलगा सचिन बेनीबागडे याला पोलिसांनी अटक केली आहे. नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतील बिड्गाव येथे ५० वर्षीय संतोष बेनिबागडे त्याच्या दोन मुलांसह राहत होते. मोठा मुलगा मनोज याचे लग्न झालंय, तर लहान मुलगा सचिन खासगी कंपनीत काम करतो. संतोषला दारूचे व्यसन जडले होतं. त्यामुळं कुटुंबात नेहमी भांडणे होत होती.

संतोषच्या दारूच्या व्यसनापायी त्याची पत्नी भावाकडे राहायला गेली होती. शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या संतोषचा लहान मुलगा सचिन सोबत जोरदार वाद झाला. सचिनने रागाच्या भरात वडिलांवर लोखंडी सळीने जोरदार प्रहार केला. यात ते गंभीर जखमी झालेत. त्यांचा जागीच मृत्यू झाला. नंदनवन पोलिसांनी आरोपी सचिनविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत.