भिवंडीत चेक पॉंइंट कंपनीला भीषण आग

भिवंडीत चेक पॉंइंट कंपनीला भीषण आग लागल्याने १६ गोडाऊन जाळून खाक झालीत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलाला यश आल असलं तरी अद्यापही ही आग पूर्णपणे विझलेली नाही

Updated: Dec 7, 2017, 11:58 AM IST
भिवंडीत चेक पॉंइंट कंपनीला भीषण आग

भिवंडी : भिवंडीत चेक पॉंइंट कंपनीला भीषण आग लागल्याने १६ गोडाऊन जाळून खाक झालीत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलाला यश आल असलं तरी अद्यापही ही आग पूर्णपणे विझलेली नाही

गाड्या घटनास्थळी

आग लागल्यानंतर तब्ब्ल १५० शे हुन अधिक टँन्कर आणि भिवंडी, कल्याण, उल्हासनगर ,ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

आगीचे कारण अस्पष्ट 

 भिवंडीतील  मानकोली, ओवली परिसरातील चेक पॉंइंट या कंपनीत सकाळी ९ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली मात्र आगीचे कारण समजू शकले नाही ,  या कंपनी मध्ये कागद, फर्निचरसह  असतो. 

कामगार सुरक्षित

 प्लास्टिकच्या इतर साहित्यांचा मोठ्या  प्रमाणात साठा असल्यानं अचानक लागलेल्या या आगीत  कंपनीमध्ये ४० ते ५० कामगार  अडकले होते मात्र एसएलपी सेक्युरिटी चे तब्बल ३० सुरक्षा रक्षकांनी मिळून कंपनीत अडकलेल्या  ५० कामगारांना  सुरक्षित बाहेर काढले.
 
आगीचे रूप  भीषण असल्याने भिवंडी, कल्याण, उल्हासनगर ,ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.