केमिकल कंपनीला आग, चार कामगार होरपळले

स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची प्रथमिक माहिती 

Updated: Nov 6, 2018, 09:34 AM IST
केमिकल कंपनीला आग, चार कामगार होरपळले title=
प्रातिनिधिक फोटो

अंबरनाथ : अंबरनाथमधल्या मोरीवली एमआयडीसीत भीषण आगीची दुर्घटना घडलीय. प्रिशिया केमिकल कंपनीला लागलेली भीषण आग आता आटोक्यात आलीय. या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालंय. स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची प्रथमिक माहिती आहे.

आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी सगळे कामगार जीवाच्या आकांताने कंपनीच्या बाहेर पडण्यात यशस्वी झाले.

मात्र बाहेर पडताना चार कामगार होरपळले. त्यातील दोन जण ६० टक्केपेक्षा अधिक भाजले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.