ते जळत होते, लोकं पाहत होते! आगीत होरपळून तिघांचा मृत्यू

भर रस्त्यात गाडीनं पेट घेतल्यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव आनंद जवळ घडली आहे.

Updated: Aug 23, 2017, 04:52 PM IST
ते जळत होते, लोकं पाहत होते! आगीत होरपळून तिघांचा मृत्यू title=

पुणे : भर रस्त्यात गाडीनं पेट घेतल्यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव आनंद जवळ घडली आहे. रात्री दीड वाजता आळेफाट्याजवळ स्विफ्ट गाडीनं पेट घेतला.

या अपघातात मृत्यू झालेले तिघेही वैद्यकीय व्यवसायात होते. घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला धडकल्यानं हा अपघात झाला. धडकेनं कार लॉक होऊन या तिघांना बाहेर पडता आले नसावे असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

प्रशांत चासकर , नरेश वाघ आणि दिलीप नवले अशी मृतांची नावं आहेत.  दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या येणारं एकही वाहन मदतीला धावून आलं नाही. जर वेळीच मदत मिळाली असती, तर कदाचित तिघांचे प्राण वाचवता आले असते.