पुण्यात छापखान्याला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

पुण्यात मध्यरात्री शिवाजीनगर भागातल्या एक छापखाना आणि त्याच्या गोदामाला लागलेल्या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झालाय. 

Updated: Mar 14, 2018, 08:49 AM IST
पुण्यात छापखान्याला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

पुणे : पुण्यात मध्यरात्री शिवाजीनगर भागातल्या एक छापखाना आणि त्याच्या गोदामाला लागलेल्या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झालाय. 

अग्निशमन दलाच्या सात गाड्यांनी अथक प्रयत्न करून आग विझवलीय. पण दोन जणांचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.