ओला कारमध्ये प्रसूती झाल्याने महिलेला पाच वर्षे मोफत प्रवास

एका महिलेने ओला कारमधेच मुलाला जन्म दिल्याची घटना घडली. पुणे कोंढवा परिसरात राहणारी किशोरी सिंग ही महिला तिच्या सासूसोबत डोक्टरांकडे कारने निघाली होती. 

Updated: Oct 6, 2017, 08:02 AM IST
ओला कारमध्ये प्रसूती झाल्याने महिलेला पाच वर्षे मोफत प्रवास  title=

पुणे : एका महिलेने ओला कारमधेच मुलाला जन्म दिल्याची घटना घडली. कोंढवा परिसरात राहणारी किशोरी सिंग ही महिला तिच्या सासूसोबत डोक्टरांकडे कारने निघाली होती. मात्र वाटेतच या महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या आणि हॉस्पीटलला पोहोचण्यापूर्वीच चालू गाडीतच तिची प्रसूतीही झाली. 

ओला कॅबचे ड्रायव्हर यशवंत गलांडे यांच्यासाठी देखील हा कसोटीचा क्षण होता. किशोरीला प्रसूती वेदना सुरु झाल्या तेव्हा हॉस्पीटल पाच किलोमीटर लांब होते. अशा अवस्थेतही त्यांनी जलद गतीने पुण्याच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत किशोरीला तिच्या बाळाला सुखरुप रुग्णालयात पोहोचवले. 

किशोरी अतिशय आनंदाने आणि समाधानाने तिच्या तीन दिवसांच्या बाळाला घेऊन रुग्णालयातूनबाहेर पडली. त्यांना रुग्णालयातूनमधून  घरी सोडण्यासाठी ओलाचे यशवंत गलांडे हेच चालक आले होते. इतकच नव्हे तर ओला कंपनीने सिंग दाम्पत्यासाठी पाच वर्ष मोफत सेवा देण्याचीही घोषणा केली आहे.