बालकांचा मृत्यू इनक्युबेटरच्या शॉर्ट सर्किटमुळे?

अमरावतीतल्या पंजाबराव देशमुख रुग्णालयात चार बालकांचा झालेला मृत्यू इनक्युबेटरच्या शॉर्ट सर्किटमुळे झाल्याची शक्यता आहे. 

Updated: May 29, 2017, 03:35 PM IST
बालकांचा मृत्यू इनक्युबेटरच्या शॉर्ट सर्किटमुळे? title=

अमरावती : अमरावतीतल्या पंजाबराव देशमुख रुग्णालयात चार बालकांचा झालेला मृत्यू इनक्युबेटरच्या शॉर्ट सर्किटमुळे झाल्याची शक्यता आहे.  एकाच वेळी चार नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णालयात प्रचंड तणाव आहे. वॉर्ड क्रमांक 9 आणि 10 मध्ये जन्मलेल्या चार नवजात बालकांचा एकाच वेळी मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत सगळ्या बाळांची प्रकृती बरी होती.

 रात्री साडे नऊ वाजता बाळांच्या आईनं दूध पाजल्यानंतर रुग्णालयातली नर्स बाळांना NICU मध्ये ठेवण्यासाठी घेऊन गेली. पुन्हा अकरा वाजता बाळांना दूध पाजायचं होतं. पण त्यावेळी नर्सनं बाळांना आणायला नकार दिला. 

रात्री अकराच्या सुमाराला NICUमधून मोठा आवाज आला. रात्री बारा वाजता या बाळांच्या शरीराचा रंग एकदम लाल-पिवळा पडला, आणि त्यानंतर एक वाजता या चारही बाळांचा मृत्यू झाला. पण या मृत्यूचं कारण अजून समजलेलं नाही. मृत बालकांचे नातेवाईक अतिशय संतापलेत. अखेर रुग्णालयात कमांडो पथकाला बोलावण्यात आलंय. रुग्णालयात पोलीस दाखल झालेत.