गडकरींनी रश्मी ठाकरे यांना दिले मानाचे स्थान

कोकण विकासाला चालना देणाऱ्या मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे यांना व्यासपीठावर मानाचे स्थान देण्यात आले. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन त्यांना व्यासपीठावर येणाची विनंती केली.

Updated: Jun 23, 2017, 05:23 PM IST
गडकरींनी रश्मी ठाकरे यांना दिले मानाचे स्थान title=

कुडाळ : कोकण विकासाला चालना देणाऱ्या मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे यांना व्यासपीठावर मानाचे स्थान देण्यात आले. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन त्यांना व्यासपीठावर येणाची विनंती केली.

 मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, केद्रीयमंत्री अनंत गिते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थित होत आहे. प्रथमच एकाच व्यासपीठावर उद्धव आणि राणे तब्बल १२ वर्षानंतर दिसलेत. त्यामुळे उपस्थित कार्यक्रमस्थळी जोरदार चर्चा होती. मात्र, व्यासपीठावर रश्मी ठाकरे यांची एंट्री होतात त्यांच्याच उपस्थितीची चर्चा रंगू लागली.

दरम्यान, कार्यक्रमाआधी नारायण राणे ग्रीन रूममध्ये असल्याने उद्धव ठाकरे यांनी ग्रीन रूममध्ये जाणं टाळले. त्यामुळे आता व्यासपीठावर उद्धव आणि राणे काय बोलतात याकडे लक्ष लागलेय.