सोने व्यापाऱ्याचा डोबिंवलीतील गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा

डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची फसवणूक

Updated: Nov 12, 2018, 02:40 PM IST
सोने व्यापाऱ्याचा डोबिंवलीतील गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा title=

डोंबिवली : सोने व्यापाऱ्याने गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार डोंबिवलीत समोर आलाय. अजित कोठारी असं या व्यापाऱ्याचं नाव असून तो दुबईत पळून गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. आधी विजय मल्ल्या, मग निरव मोदी आणि त्यासारखाच आणखी एक प्रकार म्हणजे डोंबिवलीचा अजित कोठारी!.

डोंबिवली शहरातला नामांकित सोनं व्यापारी असलेला कोठारी गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परदेशात पसार झालाय. आणि यामुळेच डोंबिवलीकर पुरते हवालदिल झालेत. डोंबिवलीच्या मानपाडा रोडवर प्रथमेश ज्वेलर्स नावानं दुकान चालवणाऱ्या कोठारीनं ग्राहकांना अनेक आमिषं दाखवत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक स्वीकारली होती. 

ग्राहकांच्या पैशातून कोठारीनं डोंबिवलीसह अंबरनाथ, बदलापूर, वांगणी आणि थेट दुबईतही मालमत्ता विकत घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फसवणूक करुन पळालेल्या कोठारीला लवकरात लवकर शोधून काढावं, अशी मागणी गुंतवणूकदारांमधून केली जाते आहे.