बीएसएनएलकडून खुशखबर, 4 जी मोबाईल सेवा

बीएसएनएलकडून मोबाईल ग्राहकांसाठी खुशखबर. ही नवी सेवा सुरु केली.

Updated: Oct 10, 2018, 04:40 PM IST
बीएसएनएलकडून खुशखबर, 4 जी मोबाईल सेवा
Pic - Reuters

भंडारा : नवरात्रीचा शुभ मुहूर्तावर भारतीय दूरसंचार निगमने ( बीएसएनएल ) ४ जी मोबाईलची सेवा सुरु करण्यात आली आहे. याची सुरुवात आज भंडारा जिल्ह्यापासून करण्यात आली. तर राज्यात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यात सर्वात प्रथम ४ जी सेवा सुरु करण्यात आलेय.

या आधी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी थ्रीजी सेवेच्या माध्यमातून २ ते ३ एमबी इतकी स्पीड मिळत होता. त्यामुळें त्यामुळे स्पर्धेचा या युगात इतर मोबाईल कंपनी तर्फे देण्यात येणाऱ्या  ४ जी सेवेमुळे बीएसएनएल मागे कंपनी मागे होती. मात्र, 4 जी सेवेमुळे स्पर्धेत वाढ होणार आहे.

खासदार मधुकर कुकडे यांचा हस्ते 4 जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात 4 जी सेवेसाठी १५७ टॉवर उभारण्यात आले असून त्यापैकी ११५ टावर सुरु आहेत. उर्वरित टॉवर येत्या काही दिवसातच सुरु होणार आहेत. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close