आजीकडूनच 3 महिन्यांच्या नातीचा गळा आवळून खून

धक्कादायक प्रकार आला समोर

Updated: Oct 8, 2018, 09:53 AM IST
आजीकडूनच 3 महिन्यांच्या नातीचा गळा आवळून खून title=

कोल्हापूर : आर्थिक अडचणीमुळे आजीनंच तीन महिन्यांच्या नातीचा गळा आवळून खून केलाय. कोल्हापुरातल्या यादवनगरमध्ये ही घटना घडली आहे.

आजी महोबतबी मुल्लाला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शफिना असं नातीचं नाव होतं. आरोपीचे आपल्या सुनेबरोबरही सतत वाद होत असल्याचं समोर आलं आहे.