...आणि त्या हृदयाची धडधड अखेर थांबली!

नाशिकमध्ये धक्कादायक बातमी घडलीये. आपल्याकडे  सरकारी काम आणि वर्षभर थांब ही म्हण सर्वश्रृत आहे. पण ही खरी करून दाखवण्यासाठी नाशिकच्या विमानतळवरचे कर्मचारी कुठल्या थराला गेले हे जर तुम्ही ऐकलं, तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. काल रविवार असल्यानं कामावर न येण्याच्या अट्टाहासापायी एक जिवंत हृदय वाया गेलंय.  

Updated: Feb 26, 2018, 10:11 AM IST
...आणि त्या हृदयाची धडधड अखेर थांबली! title=

नाशिक : नाशिकमध्ये धक्कादायक बातमी घडलीये. आपल्याकडे  सरकारी काम आणि वर्षभर थांब ही म्हण सर्वश्रृत आहे. पण ही खरी करून दाखवण्यासाठी नाशिकच्या विमानतळवरचे कर्मचारी कुठल्या थराला गेले हे जर तुम्ही ऐकलं, तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. काल रविवार असल्यानं कामावर न येण्याच्या अट्टाहासापायी एक जिवंत हृदय वाया गेलंय.  

 अवयवदान करणाऱ्या एक दात्याचे हृदय चेन्नईला एक रुग्णाला आवश्यक होते. पण हिंदुस्तान एरोनाटिक्सच्या अधिकाऱयांनी आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाची रविवारी सुटी असल्यानं विमान उतरवण्यासाठी परवानगी मिळाली नाही. आणि या हृदयाची धडधड अखेर थांबली .

नाशिकच्या अरुण गणपत तांबोळी या गृहास्थाचा अंबड परिसरात शनिवारी अपघातात  मृत्यू झाला.  त्याच्या पत्नींनं आणि नातेवाइकाने तातडीने शरीर दान करून पाच ते सहा जणांना अवयव दान केले. यातली यकृत, मूत्रपिंड, डोळे  आणि त्वचा पुण्याला रुग्णांना देण्यात आले. त्यासाठी नाशिक- पुणे रस्त्यावर ग्रीन कॉरिडार करण्यात आला होता. मात्र हवाई नियंत्रण कक्षाच्या ढिसाळ कारभाराने आज अवयवदान करण्याचा निर्णय घेणाऱ्या तांबोळी कुटुंबाचा अपमान केला आहे. 

विशेष म्हणजे अवयावदानाची चळवळ सुरू करणाऱ्या गिरीश महाजन नाशिकमध्ये असताना असा प्रकार घडल्यान एच ए एल प्रशासनानं याबाबतीत गंभीर दखल घेण्याची गरज आहे.