पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, धरणं ओव्हर फ्लो

उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसत आहे.

Updated: Aug 20, 2017, 04:16 PM IST
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, धरणं ओव्हर फ्लो title=

पुणे : उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसत आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने या भागात चांगलाच जोर धरला आहे. खेड तालुक्यातील चास कमाण धरणातून २५०० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सुरू आहे.

तर आंबेगाव तालुक्यातील डिंबा धरणातूनही ३००० क्यूसेक्सने घोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमानात सुरू आहे, त्यामुळे दोन्ही तालुक्यातील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे बळीराजा आता चांगलाच सुखावला असून करपू लागलेल्या पिकांना आता जीवनदान मिळणार आहे.

रात्री पासून पडणा-या मुसळधार पावसामुळे शेतांमध्येही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले असून शेते ही तुडूंब भरली आहेत तर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे ओढ्या नाल्यांना तसेच नद्याही दुथडी भरून वाहत आहेत.