कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग, आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धरणक्षेत्रातील पाऊस आणि धरणातील पाणीसाठा या पार्श्वभूमीवर कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.

Updated: Jul 29, 2017, 11:45 AM IST
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग, आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा  title=

कोयना : धरणक्षेत्रातील पाऊस आणि धरणातील पाणीसाठा या पार्श्वभूमीवर कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आलंय.

या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. नदीकाठच्या २७८ गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणात आता एकूण पाणीसाठा ८२.८६ टीएमसी आणि पाणीउंची २१४३.३ फूट इतकी झालीय.

पावसाचा जोर लक्षात घेऊन येत्या ४८ तासांत कोणत्याही क्षणी धरणाचे सहा वक्री दरवाजे वर उचलून त्यातून मोठ्या प्रमाणावर विनावापर पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. याबाबत सर्वत्र सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.