ट्रक आणि महिंद्रा जीपचा भीषण अपघात, सहा जण जागीच ठार

भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झालेत तर दोन जण गंभीर जखमी आहेत.

Updated: Sep 21, 2018, 04:50 PM IST

हिंगोली : हिंगोली-वाशिम रोड वर ट्रक आणि महिंद्रा जीपच्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झालेत तर दोन जण गंभीर जखमी आहेत. अपघातग्रस्त जीप वाशिमहून हिंगोलीकडे येत होती. अन्नपूर्णा शाळेजवळ या जीपची ट्रकला धडक झाली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय.. तर दोघा जखमींना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलंय.

हिंगोली-वाशिम रोडवरील अन्नपूर्णा शाळेजवळ भरधाव येणाऱ्या ट्रकने महिंद्रा जीपला जोरदार ठोकर दिली. हा अपघात एवढा भीषण होता की  सहा जणांना जागीच आपले प्राण गमवावे लागले.

वाहतूक ठप्प 

 दरम्यान या दुर्घटनेनंतर ट्रक चालक फरार झालाय. या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांची संख्या खूप आहे. पण अनेकदा वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही. ट्रक आणि महिंद्रा जीपच्या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केलीय.