उत्तरपत्रिका जळल्या प्रकरणी शिक्षण मंडळ जबाबदारी झटकतंय?

दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका जळल्या प्रकरणाला २४ तासापेक्षा अधिक काळ लोटलाय. तरीही अद्याप माध्यमिक शिक्षण मंडळाचं पथक केजकडे फिरकलेलं नाही. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 5, 2018, 08:50 AM IST
उत्तरपत्रिका जळल्या प्रकरणी शिक्षण मंडळ जबाबदारी झटकतंय? title=

बीड : दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका जळल्या प्रकरणाला २४ तासापेक्षा अधिक काळ लोटलाय. तरीही अद्याप माध्यमिक शिक्षण मंडळाचं पथक केजकडे फिरकलेलं नाही. 

अधिकारी जबाबदारी झटकताहेत?

त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पेपर जळाले त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान, या प्रकरणात शिक्षण विभागाचे अधिकारी मात्र जबाबदारी झटकतांना दिसून येतंय. केजमध्ये शनिवारी स्ट्राँग रूममध्ये ठेवलेल्या दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका अचानक आग लागल्यानं जळल्या होत्या. 

१२०० पेक्षा उत्तरपत्रिका जळाल्या

1200 पेक्षा अधिक उत्तरपत्रिका जळल्यानं खळबळ उडाली होती. या घटनेला 24 तास झाले तरीही आद्यप कोणतीच कारवाई अथवा निर्णय झालेला नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र शिक्षण मंडळाचं पथक अथवा अधिकारी अद्याप आलेले नाहीत.