धक्कादायक ! पत्नीने दारूची बाटली लपविल्याने पतीची आत्महत्या

काही दिवसांपूर्वीच घरात लक्ष न देता सतत टिव्ही बघत बसणा-या नव-यावर पत्नीने चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली होती.

Updated: Aug 22, 2017, 10:18 PM IST
धक्कादायक ! पत्नीने दारूची बाटली लपविल्याने पतीची आत्महत्या title=

नागपूर : काही दिवसांपूर्वीच घरात लक्ष न देता सतत टिव्ही बघत बसणा-या नव-यावर पत्नीने चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली होती. आता नागपूरमध्येही एक विचित्र घटना घडली आहे.

पत्नीने दारूची बाटली लपविल्याने संतापलेल्या पतीने आत्महत्या केल्याची विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे.  रामप्रवेशसिंग देवनंदनसिंग बिसेन असे ५६ वर्षीय आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.  सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ते वर्धा येथे एमएसईबीत कार्यरत होते. दारूचे व्यसन असलेले रामप्रवेशसिंग यांनी नेहमीप्रमाणे सोमवारीही दारू प्यायली. इतकेच नाही तर एक बाटली घरीही घेऊन आले. 

घरी येऊन हातपाय धुण्यास ते बाथरूमध्ये गेले असता त्यांच्या पत्नीने दारूची बाटली लपवली. बाहेर आल्यावर ते बाटली शोधू लागले. मात्र, त्यांना बाटली मिळत नव्हती. त्यानंतर रामप्रवेशसिंग यांनी संत्र्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आक‌‌‌स्मिक मृत्यूची नोंद केली आहे.