विराट कोहलीला पाहायचाय रायगड

मुंबई : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका असा कसोटी सामना पुण्यात होत आहे. या सामन्याचा आजचा चौथा दिवस. सध्या भारतीय संघ पुण्याच्या गहुंजे मैदानावर कसोटी सामना खेळत आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने छत्रपती संभाजी महाराजांची भेट घेतली. 

यावेळी विराट कोहलीने छत्रपती संभाजे राजांकडे रायगड किल्ला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. हा फोटो छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केला आहे. 

विराट कोहलीसोबत महाराष्ट्राच्या क्रिकेटबद्दल बोलले. ही भेट भारतीय क्रिकेट संघाचे निवड समितीचे सदस्य जतीन परांजपे यांनी घडवून आणली. परांजपे यांनी विराट कोहलीला संभाजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांबद्दल करत असलेल्या कामाची माहिती दिली होती. त्यामुळे विराटने स्वतः होऊन रायगड किल्ल्यावर येण्याची ईच्छा व्यक्त केली.

येत्या काळात 'महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन' च्या माध्यमातून भरपूर काम करायचं आहे. महाराष्ट्राच्या तळागाळातील टॅलेंटेड खेळाडूंना योग्य संधी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे, असे संभाजी राजेंनी सांगितलं.

विराट कोहलीने नवीन विक्रम रचला आहे. पहिल्या डाव्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने दुहेरी शतक करत 601 धावा करत विशाल स्कोर केला आहे. भारतीय संघाचा कर्णधार असताना विराट कोहली 50 व्या कसोटी सामन्याचे कर्णधार पद सांभाळत आहे. विराट कोहली दक्षिण आफ्रिकेला कसोटी सामन्यात फॉलोऑन देणारा पहिला भारतीय कर्णधार आहे. 

READ SOURCE