कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये टीसीला प्रवाशांकडून बेदम मारहाण

कुशीनगर एक्सप्रेसमधल्या टीसीला प्रवाशांनी बेदम मारहाण केलीय.

Updated: Jun 27, 2018, 06:19 PM IST

जळगाव : कुशीनगर एक्सप्रेसमधल्या टीसीला प्रवाशांनी बेदम मारहाण केलीय. तिकीट तपासनीस लीलाधर पाटील यांना कुशीनगर एक्स्प्रेसच्या पँटरी कारमध्ये बसलेल्या दहा ते बारा प्रवाश्यांनी बेदम मारहाण केली. लिलाधर पाटील हे मंगळवारी सकाळी कुशीनगर एक्स्प्रेसमधून इटारसीपर्यंत ड्युटीवर होते.

गाडीने खंडवा स्थानक सोडल्यानंतर पॅन्ट्रीकारमधल्या १० ते १२ जणांकडून पाटील यांनी तिकिटाची विचारणा केली. त्यानंतर प्रवाशांनी त्यांनी शिवीगाळ आणि मारहाण केली. पाटील यांनी हरदा स्थानकावर रेल्वे पोलिसांना झालेल्या या घटनेची माहिती दिली. मात्र, त्यांनी तक्रार देण्यासाठी गाडीतून खाली उतरण्याची सूचना केली. पाटील यांची इटारसीपर्यंत ड्युटी असल्याने त्यांनी इटारसीला तक्रार दाखल केली. मात्र, मारहाण करणाऱ्यांनी इटारसी स्थानकावर उतरून पळ काढला.