मास्तर तुम्हीपण ! शिक्षकांच्या हाणामारीची परंपरा यावर्षीही कायम

शिक्षक धुडघुस घालत असल्याचे प्रकार यावेळीही कायम राहिल्यानं काय हो मास्तर आता तुम्ही पण असं म्हणायची वेळ आलीय.

Updated: Aug 5, 2018, 08:22 PM IST
मास्तर तुम्हीपण ! शिक्षकांच्या हाणामारीची परंपरा यावर्षीही कायम title=

जळगाव : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीत हाणामारीची परंपरा शिक्षकांनी यावर्षीही कायम ठेवली. नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात १०९ व्या सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली,. सभेला सुरुवात होताच काही सभासद शिक्षकांनी विविध विषयांवर संचालक मंडळाशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी भडगावमधील शिक्षक राकेश पाटील यांनी संचालकांना जाब विचारण्यासाठी व्यापीठावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना लाथ मारून खाली ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय.

शिक्षकांची धुडघुस 

या पतपेढीच्या प्रत्येक सभांमध्ये शिक्षक धुडघुस घालत असल्याचे प्रकार यावेळीही कायम राहिल्यानं काय हो मास्तर आता तुम्ही पण असं म्हणायची वेळ आलीय.