मोबाईल बॅटरीच्या स्फोटात मुलाने गमावली 2 बोटं

Updated: May 18, 2018, 08:15 PM IST

मुंबई : मोबाईल बॅटरीशी खेळताना बॅटरीचा अचानक स्फोट झाल्याने 10 वर्षाच्या मुलाच्या दोन्ही हातांच्या बोटांना गंभीर दुखापत झालीय. उमेश राठोड असं जखमी झालेल्या मुलाचं नाव असून मोबाईल बॅटरीचा स्फोट झाल्याने उमेशच्या डाव्या हाताची 2  बोटं तुटली. जालना जिल्ह्यामधल्या परतूर तालुक्यातील कोकाटे हादगावात ही दुर्घटना घडली. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घरात आई वडील नसताना लहान भावाबरोबर उमेश मोबाईलच्या बॅटरीशी खेळत होता तेव्हा अचानक बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटामुळे उमेशच्या डाव्या हाताची 2 बोटे तुटली. दरम्यान ही घटना समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी उमेशला जालन्यातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

मोबाईल बॅटरीशी खेळताना बॅटरीचा अचानक स्फोट झाल्याने 10 वर्षाच्या मुलाच्या दोन्ही हातांच्या बोटांना गंभीर दुखापत झालीय.उमेश राठोड असं जखमी झालेल्या मुलाचं नाव असून मोबाईल बॅटरीचा स्फोट झाल्याने उमेशच्या डाव्या हाताची 2  बोटे तुटली आहेत.परतूर  तालुक्यातील कोकाटे हादगावात ही दुर्घटना आज सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घडली.

घरात आई वडील नसताना लहान भावा बरोबर उमेश मोबाईलची बॅटरीशी खेळत होता तेव्हा अचानक बॅटरीचा स्फोट झाला.या स्फोटामुळे उमेशच्या डाव्या हाताची 2 बोटे तुटली.दरम्यान ही घटना समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी उमेशला जालन्यातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.