पुण्याच्या या गोल्डमॅनकडे सोन्याची ऑडी, आयफोनही सोन्याचा

गोल्डन मॅन नावाने प्रसिद्ध असलेला पुण्याच्या सनी वाघचौरे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सनी वाघचौरेने त्याच्या सोन्याच्या कलेक्शनमध्ये सोन्याचा शूजचा समावेश केलाय. याचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियात शेअर केलाय. 

Updated: Oct 12, 2017, 06:10 PM IST
पुण्याच्या या गोल्डमॅनकडे सोन्याची ऑडी, आयफोनही सोन्याचा

मुंबई : गोल्डन मॅन नावाने प्रसिद्ध असलेला पुण्याच्या सनी वाघचौरे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सनी वाघचौरेने त्याच्या सोन्याच्या कलेक्शनमध्ये सोन्याचा शूजचा समावेश केलाय. याचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियात शेअर केलाय. 

पुण्याच्या पिंपरी शहरात राहणारा सनी वाघचौरे बिझनेस करतो. त्याला सोन्याची इतकी आवड आहे की, त्याच्या ऑडी कारपासून ते आयफोनपर्यंत सगळंच सोन्याचं आहे. जवळपास २.५ ते ३ किलो सोन्याचे दागिणे तो स्वत: घालतो. 

त्याच्या या अनोख्या शौकामुळे अनेक बॉलिवूड अभिनेतेही त्याचे फॅन आहेत. गेल्या वर्षी जेव्हा सनी वाघचौरे आपल्या भावासोबत ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आला होता तेव्हा कपिलही सोनं पाहून हैराण झाला होता. गंमतीने कपिल सनीच्या पायाही पडला होता. 

सनी बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा जवळचा मानला जातो. दोघे अनेक कार्यक्रमांमध्ये सोबत दिसतात. त्यासोबतच सलमान खान, करीना कपूर, सोहेल खानसोबतच त्याचे फोटो आहेत. 

एका मीडिया रिपोर्टनुसार, नोटबंदीवेळी सोनं घातल्याने सनीवर आरोपही लावण्यात आले की, तो काळ्या पैशांनी खरेदी केलेलं सोनं घालतो. नंतर त्यावर सनी स्पष्टीकरण दिलं होतं की, हे सोनं त्याने त्याच्या पैशांनी विकत घेतलंय आणि सरकारकडे त्याचा रेकॉर्ड आहे.