KDMC अतिरिक्त आयुक्त संजय घरतना लाच घेताना अटक

कल्याण डोंबिवली महापालिकेचे वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त संजय घरत 

Updated: Jun 13, 2018, 09:26 PM IST

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचे वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त संजय घरत अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हातात सापडलेत. संजय घरत यांना ८ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आलीय. २७ गावातल्या एका अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी घरत यांनी ४२ लाखांची मागणी केली होती. या रक्कमेवर तडजोड होऊन ३५ लाख रूपये देण्याचं ठरलं होतं. मात्र तक्रारदाराने याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. लाचेतला पहिला ८ लाखांचा हफ्ता स्वीकारताना घरत अलगद जाळ्या सापडले. घरत यांच्या कार्यालयातल्या दोन लिपीकांचीही या प्रकरणी चौकशी सुरू आहे. घरत यांच्या याआधीही अनेक प्रकरणात चौकशी सुरू आहेत.