सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्यानं अपहृत बाळाची सुखरुप सुटका

अपहरण करण्यात आलेल्या आठ महिन्यांच्या बाळाची सुखरूप सुटका करण्यात आलीय. 

Updated: Feb 13, 2018, 10:37 PM IST
सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्यानं अपहृत बाळाची सुखरुप सुटका

पुणे : अपहरण करण्यात आलेल्या आठ महिन्यांच्या बाळाची सुखरूप सुटका करण्यात आलीय. 

पुणे रेल्वे स्थानकाबाहेरच्या दर्ग्याजवळून ५ फेब्रुवारीला बाळ पळवण्यात आलं होतं. रंजना जगन्नाथ पांचाळ उर्फ अनुष्का रविंद्र रणपिसे या महिलेने बाळाचं अपहरण केलं होतं. 

या महिलेला अटक करून पोलिसांनी बाळाची सुखरूप सुटका केलीय. लक्ष्मी आणि गेनसिद्ध चाबुकस्वार यांचं हे बाळ आहे. 

महत्त्वाचं म्हणजे, सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यास मदत झालीय.