वसईत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

वसईत चाकूचा धाक दाखवून १३ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Updated: Feb 13, 2018, 10:29 PM IST
वसईत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

वसई : वसईत चाकूचा धाक दाखवून १३ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आठ जणांचे टोळके या मुलीची छेडछाड करुन तिला पळवण्याचा प्रयत्न करत होते. मुलीने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक धावत तिथे पोहचले. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी तिथून पळ काढला आणि तिची सुटका झाली. 

सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता ही मुलगी शाळेत जात असताना ही घटना घडली. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन माणिकपूर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

धक्कादायक म्हणजे, सर्व आरोपी अल्पवयीन असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आलंय. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close