सोमय्या यांचीही सेनेवर बोचरी टीका

किरिट सोमय्या यांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 22, 2017, 11:38 AM IST
सोमय्या यांचीही सेनेवर बोचरी टीका title=

मुंबई : मिरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना असा संघर्ष रंगला होता.  या दोन पक्षांमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान चुरस पाहायला मिळाली.

दरम्यान काल लागलेल्या निकालात ‘मिरा भाईंदर महापालिकेत भाजपचा विजय झाला असून शिवसेनेचा दारुण पराभव झाला आहे. यानंतर सेना-भाजपाच्या मोठ्या नेत्यांनी या निकालावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या. 

निकालानंतर भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी सेनेवर टीका केली होती. 

या निवडणुकीच्या निकालात भाजपला ६० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेने २२ जागा ‌जिंकल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेशात पनवेलनंतर आता मिरा भाईंदर महापालिकेची सत्ताही भाजपने काबीज केली आहे.

आता किरिट सोमय्या यांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मिरा भाईंदरच्या पराभवातून आता शिवसेनेने धडा घ्यावा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मान राखावा, असे सल्ला ‌खासदार सोमय्या यांनी दिला आहे.