कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ मेळाव्यात राडा

 कोल्हापुरात राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्षांना मारहाण.

Updated: Sep 13, 2018, 09:55 PM IST
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ मेळाव्यात राडा title=

कोल्हापूर : राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्‍वास नेजदार यांना मारहाण करण्यात आली. गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे  अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्याविषयी विश्‍वास नेजदार यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या करवीर तालुका संपर्क मेळाव्यात हा मारहाणीचा प्रकार घडला.

एका व्यक्तीने नेजदार यांना खुर्ची फेकून मारली. उपस्थितांपैकी काहींनी नेजदार यांना बाजूला नेल्याने अनर्थ टळला. दरम्यान, वार्षिक सभेच्या अपुऱ्या जागेवरून संचालक वसंत खाडे आणि माजी संचालक बाबासाहेब चौगले यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. 

करवीर तालुक्याच्या संपर्क सभेसाठीच ही जागा अपुरी पडत असताना सर्वसाधारण सभा या ठिकाणी कशाला घेता, असा जाब चौगले यांनी विचारल्यानंतर त्यांच्याही दिशेने कार्यकर्ते धावले. यावरून खाडे-चौगले यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.